महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणीची करा, प्रिती सातम यांचे महापौर व आयुक्तांना पत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2026

महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणीची करा, प्रिती सातम यांचे महापौर व आयुक्तांना पत्र


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणासह इतर नागरी सुविधा प्रकल्पांतील कंत्राटी कामगारांची ओळख आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नगरसेविका प्रिती सातम यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

सातम यांनी पत्रात नमूद केले आहे की, शहरातील मोठ्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार नियुक्त केले जात आहेत. मात्र, त्यांच्या ओळखीची व कागदपत्रांची पुरेशी तपासणी होत नसल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने सर्व कामगारांची योग्य पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईसारख्या महानगरात विविध भागांमध्ये—मालाड, गोरेगाव, दहिसर, विक्रोळी, उत्तर-दक्षिण मुंबई आदी परिसरांत—मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदारांनी नियुक्त केलेल्या कामगारांची नोंद, त्यांची ओळखपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे तपासून त्याची नोंद महापालिकेकडे असावी, अशी मागणी सातम यांनी केली आहे.

यासोबतच, कामगारांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी किंवा पोलिस प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ढिलाई परवडणारी नसल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

महापालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती प्रिती सातम यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS