BEST आता ONDC नेटवर्कवर; बस तिकीट बुकिंग अधिक सुलभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2026

BEST आता ONDC नेटवर्कवर; बस तिकीट बुकिंग अधिक सुलभ


मुंबई - बेस्टने (BEST) आपल्या डिजिटल तिकीट सेवांचा विस्तार करत आता Open Network for Digital Commerce (ONDC) नेटवर्कवर प्रवेश केला आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांना बस तिकीट खरेदी अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

BEST प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत स्मार्ट कार्ड, मोबाईल अ‍ॅप्स आणि डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून तिकीट व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. आता ONDC प्लॅटफॉर्मशी जोडल्यामुळे प्रवाशांना विविध लोकप्रिय अ‍ॅप्सद्वारे थेट तिकीट खरेदी करता येणार आहे.

सध्या BEST चे तिकीट ‘ONE Ticket’ अ‍ॅपवर उपलब्ध असून, लवकरच PhonePe, Paytm, WhatsApp, RedBus, Rapido आणि NammaYatri यांसारख्या अ‍ॅप्सवरही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वेगळी अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज राहणार नाही.

या एकत्रीकरणामुळे सध्या १५–१६ टक्के असलेला डिजिटल तिकीट वापर २५–३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ONDC नेटवर्कमुळे बस, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून ‘फर्स्ट माईल ते लास्ट माईल’ प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

ONDC हा भारत सरकारच्या Department for Promotion of Industry and Internal Trade अंतर्गत उपक्रम असून, देशभर डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. सध्या हा उपक्रम देशातील २६ शहरांत कार्यरत आहे.

BEST-ONDC एकत्रीकरणामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, एकात्मिक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS