मालमत्ता करात BMCची विक्रमी कामगिरी; ७,५३४ कोटींचा महसूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 April 2026

मालमत्ता करात BMCची विक्रमी कामगिरी; ७,५३४ कोटींचा महसूल


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मालमत्ता कर संकलनात यंदा विक्रमी कामगिरी करत निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ७,३४१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, तर ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत तब्बल ७,५३४ कोटी रुपयांचे संकलन करण्यात आले आहे. म्हणजेच उद्दिष्टाच्या तुलनेत १०२ टक्के महसूल वसुली साध्य झाली आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी ही माहिती देताना सांगितले की, प्रभावी जनजागृती मोहीम, थकबाकीदारांवर केलेला काटेकोर पाठपुरावा आणि करनिर्धारण व संकलन विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.

३१ मार्च रोजी एका दिवसातच ३३७ कोटी २६ लाखांहून अधिक रक्कम जमा झाली असून, रात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. थकीत कर तात्काळ भरण्याचे आवाहनही त्यांनी मालमत्ता धारकांना केले आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांतही महानगरपालिकेने करसंकलनात सातत्यपूर्ण प्रगती नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११६ टक्के, २०२३-२४ मध्ये १०८ टक्के तर २०२४-२५ मध्ये जवळपास १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली होती. यंदा मात्र ७,५३४ कोटींच्या विक्रमी संकलनासह BMCने पुन्हा एकदा आपली आर्थिक ताकद सिद्ध केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS