अश्विनी भिडे यांनी पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2026

अश्विनी भिडे यांनी पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदाचा पदभार आश्विनी भिडे यांनी आज (३१ मार्च २०२६) स्वीकारला. त्या BMCच्या इतिहासातील आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला सनदी अधिकारी ठरल्या आहेत.

मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, डॉ. अश्विनी जोशी, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे तसेच उपायुक्त प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

१९९५ च्या बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या भिडे यांना सुमारे ३१ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी राज्यात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, सह सचिव, तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिवपदी आणि मुख्यमंत्री कार्यालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

यापूर्वी त्यांनी ९ मे २०२० ते १९ मार्च २०२४ या कालावधीत BMC मध्ये अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून कार्य केले होते. तसेच मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प पूर्ण करण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्था व संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS