बोरिवलीतील थॅलेसेमिया केअर सेंटरच्या खाजगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2026

बोरिवलीतील थॅलेसेमिया केअर सेंटरच्या खाजगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध


मुंबई - बोरिवली (पूर्व) येथील कॉम्प्रेहेेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्राच्या प्रस्तावित खाजगीकरणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केंद्राचे संचालन पालिकेने स्वतः करावे, सर्व सुविधा मोफत द्याव्यात आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ नये, अशी मागणी केली.

मंगळवारी पेडणेकर यांनी बोरिवलीतील केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार विलास पोतनीस, माजी नगरसेवक उदेश पाटेकर आदी उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, या केंद्रात दुर्धर आजारांनी ग्रस्त बालके आणि लहान मुलांवर दर्जेदार उपचार केले जात असून अल्पावधीतच या रुग्णालयाने नावलौकिक मिळवला आहे. अशा महत्त्वाच्या सेवेला आर्थिक कारण पुढे करून खाजगीकरणाच्या मार्गावर नेणे योग्य नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR), संयुक्त भागीदारी तत्त्व किंवा इतर पर्यायांचा विचार करून हे केंद्र पालिकेनेच चालवावे. तसेच येथे कार्यरत डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुठलाही परिणाम होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत जवळपास चार वर्षे प्रशासकीय राजवट होती. या काळात सार्वजनिक आरोग्य खात्यावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

विद्यमान महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या यापूर्वीही पालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होत्या. आयुक्त म्हणून काम करताना त्या कोणताही दुजाभाव न करता निर्णय घेतील, अशी अपेक्षा मुंबईकरांची असल्याचेही पेडणेकर यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS