पश्चिम उपनगरातील रुग्णालये, प्रसूतिगृह पुनर्विकासाला गती द्या - अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2026

पश्चिम उपनगरातील रुग्णालये, प्रसूतिगृह पुनर्विकासाला गती द्या - अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा


मुंबई - पश्चिम उपनगरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालये आणि प्रसूतिगृहांच्या पुनर्विकास कामांना वेग द्यावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.

डॉ. शर्मा यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाला भेट देऊन ३२५ खाटांच्या सुपरस्पेशालिटी प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पात कर्करोग, हृदयरोग, मज्जातंतू, यकृत व मूत्रपिंड विभागांचा समावेश असून ११ मजली इमारतीपैकी ९ मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

सद्यस्थितीत रुग्णालयाची क्षमता ४४४ खाटांची असून पश्चिम उपनगरातील सुमारे ३० ते ४० लाख नागरिकांना येथे आरोग्यसेवा दिली जाते. वाढता ताण लक्षात घेता रुग्णालय इमारतीवर अतिरिक्त मजले उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

गोरेगाव येथील ३० खाटांच्या टोपीवाला मॅटर्निटी होमलाही त्यांनी भेट देत सुविधांचा आढावा घेतला. तसेच ओशिवरा प्रसूतिगृहाच्या पुनर्विकासांतर्गत १५० खाटांच्या नव्या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृह आणि रुग्ण कक्षांची पाहणी करून डॉ. शर्मा यांनी रुग्णांशीही संवाद साधला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS