.jpeg)
लखनऊ येथे महाबोधी महाविहार आंदोलनातील सर्व भिख्खु संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. महाबोधी महाविहार मुख्य आंदोलनाचे प्रमुख पुज्य भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात यावेळी भिख्खु संघाची बैठक घेण्यात आली होती. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पूज्य भंते अर्यवंश; भंते अनुकृती; भंते अनिरूद्ध; रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना, येत्या 26 ऑगस्टपासुन पुज्यभंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात भिख्खु संघ संपूर्ण उत्तरप्रदेशात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी भव्य यात्रा सुरु करणार आहे. या यात्रेला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले. उत्तरप्रदेशात सर्व जिल्हयात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पुजनीय भिख्खु संघाला रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते पूर्ण पाठिंबा देतील अशी ग्वाही रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे, यासाठी सुरु झालेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात रामदास आठवले यांनी मोठी भुमिका बजावलेली आहे. बुध्दगया, पटणा, महाराष्ट्र, दिल्ली आदि अनेक ठिकाणी आठवले यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेवुन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे यासाठी बुध्दगया येथे भेट देवुन त्यांनी पटना येथे बिहारचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान आणि बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला सक्रिय सहभाग घेवुन पाठिंबा दिल्यामुळेच आठवले यांना लखनऊ येथे महाबोधी महाविहार आंदोलनाच्या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन निमंत्रित केल्याची माहिती यावेळी भंते विनाचार्य यांनी दिली. यावेळी संपूर्ण उत्तरप्रदेशमधील 300 बौध्द भिख्खु उपस्थित होते. उत्तरप्रदेशात सर्व जिल्हयांमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा तिव्र करण्याच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुज्य भंते विनाचार्य यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन उत्तरप्रदेशात तीव्र करण्याची घोषणा केली.

No comments:
Post a Comment