चेंबूरमध्ये केमिकल टँकरच्या देखभाल कामादरम्यान स्फोट; एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 July 2026

चेंबूरमध्ये केमिकल टँकरच्या देखभाल कामादरम्यान स्फोट; एकाचा मृत्यू


मुंबई | जेपीएन न्यूज | १७ जुलै – चेंबूर (पूर्व) येथील मुकुंद नगर, म्हाडा वसाहत परिसरात गुरुवारी सायंकाळी केमिकल टँकरच्या देखभाल (मेंटेनन्स) कामादरम्यान झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, बेस्ट आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक माहितीनुसार, म्हैसूर कॉलनीजवळ उभ्या असलेल्या केमिकल टँकरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुमारे ५० वर्षीय एका अज्ञात व्यक्तीला सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात (LTMG) नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकरम (१९) याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर मोहम्मद फैयाज (४८) यांच्यावर उपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, केमिकल टँकरच्या देखभाल कामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS