अंधेरीत बेस्ट बसचा अपघात; चार रिक्षा, कार आणि ॲक्टिव्हाला धडक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2026

अंधेरीत बेस्ट बसचा अपघात; चार रिक्षा, कार आणि ॲक्टिव्हाला धडक


मुंबई JPN NEWS - अंधेरी पश्चिम येथील गोखले ब्रिज सिग्नलजवळ सोमवारी (१७ ऑगस्ट) दुपारी बेस्टच्या बसचा अपघात झाला. या अपघातात चार ऑटोरिक्षा, एक एर्टिगा कार आणि एका ॲक्टिव्हा स्कूटरचे नुकसान झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा डेपोची A-221/36 क्रमांकाची बस (MH-01-FE-1823) अंधेरी बस स्थानक (पश्चिम) येथून वर्सोवा बस स्थानकाकडे जात होती. दुपारी सुमारे १२ वाजता गोखले ब्रिज सिग्नलजवळ बस चालकाने हँडब्रेक सोडल्यानंतर बस अचानक पुढे सरकली. त्यावेळी समोर उभ्या असलेल्या वाहनांना बसने धडक दिली.

या धडकेत MH02EQ4812, MH02FB6449, MH02EW9599 आणि MH02GL2635 या चार ऑटोरिक्षा, MH46DC6428 क्रमांकाची एर्टिगा कार आणि MH47BM5089 क्रमांकाच्या ॲक्टिव्हा स्कूटरचे नुकसान झाले.

अपघातात ऑटोरिक्षा चालक एनुस शेख (५५) यांच्या नाकाला दुखापत झाली. पादचारी मनोजकुमार बजदेव (३०) यांच्या मानेला दुखापत झाली असून ॲक्टिव्हा चालक अनिस निसार धारी (२०) यांच्या उजव्या कमरेला दुखापत झाली आहे.

बसच्या वाहकाने तत्काळ पोलिसांना माहिती देत जखमींना पोलिसांच्या मदतीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू असून अंधेरी पोलिसांच्या निर्देशानुसार अपघातग्रस्त बस पुढील पोलिस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कुमकुम चौकी येथे उभी करण्यात आली आहे.

अपघाताच्या प्रकरणी बेस्टचे संबंधित अधिकारी आणि वेट लीज कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS