
मुंबई JPN NEWS | ८ ऑगस्ट २०२६
भोईवाडा येथील बीडीडी चाळ क्रमांक ६-अ येथे डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे तपासणी करताना इमारतीवरून तोल जाऊन खाली पडल्याने महापालिका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या PCO विभागातील कर्मचारी पांडुरंग तोडकर (वय ४७) हे ऑन-ड्युटी असताना डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे तपासण्यासाठी बीडीडी चाळ क्रमांक ६-अ येथे गेले होते. पाहणी करत असताना त्यांचा इमारतीवरून अचानक तोल गेला आणि ते खाली पडले.
या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील ऑन-ड्युटी AMO यांनी पांडुरंग तोडकर यांना तपासल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
डेंग्यू प्रतिबंधासाठी पाहणीचे कर्तव्य बजावत असताना महापालिका कर्मचाऱ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याने या दुर्घटनेबाबत अधिक तपशील तपासला जात आहे.


No comments:
Post a Comment