घाटकोपरमध्ये महिलेची हत्या; सासूविरोधात पंतनगर पोलिसांत गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2026

घाटकोपरमध्ये महिलेची हत्या; सासूविरोधात पंतनगर पोलिसांत गुन्हा दाखल


मुंबई JPN NEWS - घाटकोपर पूर्वेतील लक्ष्मीनगर परिसरात ३५ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या ६० वर्षीय सासूविरोधात पंतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्रिवेणी अपार्टमेंट, डी विंग, रूम क्रमांक २०४, लक्ष्मीनगर, घाटकोपर पूर्व येथे ही घटना घडली.

मयत महिलेचे वडील राजेंद्र नरसय्या वल्लाल (६३) यांनी याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ते टेलरिंग व्यवसाय करतात आणि नालासोपारा पश्चिम येथे राहतात.

फिर्यादीनुसार, मयत महिला आणि तिच्या वडिलांनी यापूर्वी दिलेल्या तक्रारींचा राग मनात धरून आरोपी सासू मयत महिलेच्या घरी गेली. तेथे तिने मयत महिलेला मारहाण केली. तसेच तिचा जीव घेण्याच्या उद्देशाने तिचे डोके कोणत्यातरी कठीण वस्तूवर आपटल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ८६२/२०२६ नोंदवला आहे. आरोपी महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेमागील नेमके कारण, पूर्वीच्या तक्रारींचे स्वरूप आणि हत्येची परिस्थिती याबाबत पंतनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS