खासगी रुग्णालयांना दरपत्रक ठळकपणे लावणे बंधनकारक; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

16 October 2026

खासगी रुग्णालयांना दरपत्रक ठळकपणे लावणे बंधनकारक; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार


मुंबई JPN NEWS - खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वैद्यकीय खर्चाची स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना सेवा व सुविधांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, हे दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असणे आवश्यक आहे.

या निर्णयामुळे रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा, उपचार आणि रुग्णालयीन सुविधांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काची पूर्वकल्पना मिळू शकणार आहे. त्यामुळे उपचारांचा संभाव्य खर्च समजून घेणे आणि आर्थिक नियोजन करणे सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.

रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक लावावे - 
मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांनी महाराष्ट्र नर्सिंग होम नियमावली, २०२१ मधील अनुसूची तीनमध्ये नमूद केलेल्या सेवा व सुविधांचे दर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. दरपत्रक रुग्णालयाच्या आवारातील सहज नजरेस पडणाऱ्या आणि रुग्णांना सहज पोहोचता येतील अशा महत्त्वाच्या ठिकाणी लावावे. दरांमध्ये बदल झाल्यास दरपत्रक तातडीने अद्ययावत करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

बिलिंग आणि चौकशी कक्षातही मार्गदर्शन -
रुग्णांना बिलासंदर्भातील तक्रारी उद्भवू नयेत, यासाठी लागू असलेले सेवा शुल्क, विविध उपचार पॅकेजचे दर आणि इतर आकारांची माहिती स्पष्टपणे देण्यावर भर देण्यात आला आहे. रुग्णालयातील नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना दरपत्रक आणि शुल्काबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे, असे शासन निर्णयात नमूद आहे.

परदेशी रुग्णांसाठीही विशेष पॅकेजचे दर स्पष्ट करावे -
मेडिकल व्हिसा किंवा आयुष व्हिसावर भारतात उपचारासाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी त्यांच्यासाठी लागू असलेले विशेष उपचार पॅकेजचे दरही स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

नियमभंग झाल्यास कारवाई - 
खासगी रुग्णालयांच्या नोंदणी, नियमन आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या सक्षम प्राधिकरणांनी दरपत्रक प्रदर्शित करण्याच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या निर्णयाची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS