अॅट्रॉसिटी दाखल, तरी आरोपी मोकाट! दलित कुटुंबाला न्याय देण्यात माळशिरस पोलिस अपयशी? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

27 November 2026

अॅट्रॉसिटी दाखल, तरी आरोपी मोकाट! दलित कुटुंबाला न्याय देण्यात माळशिरस पोलिस अपयशी?


सोलापूर | JPN NEWS - 
दलित कुटुंबावर शेतात घुसून हल्ला, अॅट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल, तरी आठ आरोपी मोकाट! कायद्याचा बडगा उगारला जाणार की आरोपींना अभय मिळणार? माळशिरस तालुक्यातील या घटनेने दलितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असून, गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी आरोपींना अटक न झाल्याने माळशिरस पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मारहाणीनंतर न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठीही टाळाटाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. स्थानिक दलित कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. पीडितांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, तर आरोपींवर कारवाईसाठी प्रतीक्षा का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

हाताचा चावा, हाड मोडले; हल्ल्याची गंभीरता एफआयआरमध्ये - 
माळशिरस पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०५९६/२०२६ अन्वये २४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

तक्रारीनुसार, ओमकार सोनावणे यांच्या हाताचा चावा घेण्यात आला, तर अन्य एका तक्रारदाराच्या हाताचे हाड मोडल्याचे नमूद करण्यात आले आहे. राजू आगतराव वाघ, किशोर राजू वाघ, प्रशांत राजू वाघ, श्रेयस नितीन वाघ, पंडित विजय वाघ, प्रशांत दत्तात्रय अर्जुन, ऋषिकेश महादेव वाघ आणि महादेव नामदेव वाघ या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वीही त्रास, तरी कारवाई कुठे? - 
तक्रारदार कुटुंबातील दिव्यांग व्यक्ती प्रमोद सोनावणे यांना दिव्यांगत्वावरून अपमानित करणे, टोमणे मारणे तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचे प्रकार यापूर्वीही घडल्याचा आरोप आहे. वारंवार त्रास होत असतानाही ठोस कारवाई झाली नसल्याने आरोपींचे धाडस वाढले आणि त्यातूनच हा गंभीर हल्ला झाल्याचा दावा पीडितांकडून केला जात आहे. जर आधीच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले गेले असते, तर आज परिस्थिती इतकी गंभीर झाली असती का? हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

आरोपी गावात मोकाट, पीडितांच्या मनात अटक होण्याची भीती! -
अॅट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल होऊनही आरोपी अद्याप अटक नसल्याने पीडित कुटुंब दहशतीत असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी परिसरात फिरत असल्याने पुन्हा हल्ला होण्याची भीती तक्रारदारांना सतावत आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीत तपास आणि कारवाई होणे अपेक्षित असताना तडजोडीचे प्रयत्न होत असल्याची भावना निर्माण होणे, हे पोलिस प्रशासनासाठी निश्चितच गंभीर आहे.

अॅट्रॉसिटीचा धाक आरोपींना की फक्त कागदावर? - 
दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे आहेत. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींवर तातडीने कारवाई झाली नाही, पीडितांना संरक्षण मिळाले नाही आणि न्यायासाठी त्यांनाच वारंवार पोलिसांकडे धाव घ्यावी लागली, तर या कायद्यांचा धाक उरतो कुठे?

दलितांवर अत्याचार झाल्यानंतर एफआयआर दाखल करणे ही पोलिसांची जबाबदारी; पण आरोपींवर कारवाई आणि पीडितांना संरक्षण देणे हेही तितकेच महत्त्वाचे नाही का?

सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आठही आरोपींना तातडीने अटक करावी, पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि तपासात कोणतीही दिरंगाई अथवा दबाव होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

गुन्हा दाखल झाला म्हणजे न्याय मिळाला असे नाही; आरोपींवर कारवाई आणि पीडितांना सुरक्षितता मिळाली, तरच कायद्यावरील विश्वास टिकेल. माळशिरस प्रकरणात पोलीस प्रशासन हा विश्वास निर्माण करणार की प्रश्न अनुत्तरितच ठेवणार?

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS