भाजपची सत्ता, आरोग्य समितीचे अध्यक्षही भाजपचे; तरी अपघातग्रस्ताला उपचार नाकारले! भाजप नगरसेवकानेच केली रुग्णालयाची पोलखोल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

27 November 2026

भाजपची सत्ता, आरोग्य समितीचे अध्यक्षही भाजपचे; तरी अपघातग्रस्ताला उपचार नाकारले! भाजप नगरसेवकानेच केली रुग्णालयाची पोलखोल


मुंबई | JPN NEWS - 
मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता, आरोग्य समितीचे नेतृत्वही भाजपकडे, तरी महापालिकेच्या रुग्णालयात अपघातग्रस्त तरुणाला वेळेत उपचार मिळत नसल्याचा गंभीर आरोप खुद्द भाजपच्या नगरसेवकानेच केला आहे. मालाड-मर्वे रोडवरील स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय वैभव गुप्ता याला कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय अर्थात शताब्दी रुग्णालयात उपचार न मिळाल्याचा मुद्दा भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाने पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील कथित निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या बस अपघातात वैभव गुप्ताचा एक पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला होता, तर शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. अशा अवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचार मिळण्याऐवजी त्याच्या नातेवाईकांना प्रक्रियेतच अडकवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

सकाळी ११.३० वाजता रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना दुपारी १२.५० वाजेपर्यंत केस पेपर काढण्यासाठी रांगेत थांबावे लागले. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णाला उपचारासाठी आत घेण्यात आले. मात्र, रुग्णाला आत घेतल्यानंतरही इंजेक्शन, एक्स-रे किंवा प्लास्टर यासारखे प्राथमिक उपचार करण्यात आले नाहीत, असा आरोप तिवाना यांनी केला. उलट रुग्णाला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

भाजप नगरसेवकाकडूनच आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह! - 
पालिकेच्या रुग्णालयात गरीब आणि मध्यमवर्गीय मुंबईकर उपचारासाठी येतात. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला सरकारी रुग्णालयातही उपचार मिळत नसतील, तर या व्यवस्थेचा उपयोग काय? डॉक्टर नेमके कोणत्या कामासाठी रुग्णालयात नियुक्त केले आहेत? असा संतप्त सवाल तेजिंदर सिंग तिवाना यांनी उपस्थित केला.

अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांशू भामरे यांच्या नेतृत्वाखालील विभागाने गंभीर जखमी तरुणाच्या उपचाराबाबत उदासीनता दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सत्तेत भाजप, आरोग्याची जबाबदारी कोणाची? - 
महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आणि प्रशासनाची असताना, रुग्णांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा मार्ग दाखवला जात असल्याचे आरोप वारंवार समोर येत आहेत. शताब्दी रुग्णालय हे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे सरकारी रुग्णालय आहे. अशा ठिकाणी अपघातग्रस्ताला वेळेत उपचार मिळत नसल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाने करणे, ही बाब महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर मानली जात आहे.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, चौकशीचे निर्देश देऊन प्रश्न संपणार नाही. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीचे उपचार मिळणे अपेक्षित असताना, त्याला रांगेत थांबावे लागले आणि खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला गेला असेल, तर ही केवळ एका रुग्णालयाची बाब नाही, तर मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.

भाजपची सत्ता असताना, भाजपचे नगरसेवकच पालिकेच्या रुग्णालयातील कथित हलगर्जीपणा उघड करत असतील, तर मुंबईकरांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? हा सवाल आता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS