पुण्यात चार बॉम्बस्फोट
एक जण जखमी
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास चार ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड, देना बॅंक आणि आर डेक्कन समोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या दारात सापडलेली एक बेवारस बॅग तपासण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. तपासणीसाठी गेलेले दयानंद भाऊराव पाटील या स्फोटात जखमी झाले.जंगली महाराज रस्त्यावरच असलेल्या मॅकडोनाल्डसमोर कचरा पेटीत, देना बँकेसमोर सायकलवर आणि आर डेक्कन सिनेमागृहासमोर अशाच प्रकारचे स्फोट झाले. आणखी एक बॉम्ब मॅकडोनाल्डसमोर सापडला आहे.हे स्फोट जरी कमी तीव्रतेचे असले तरी हे बॉम्बस्फोटच असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटाच्या ठिकाणी वायर, सर्किट आणि ९ वोल्टची बॅटरी असे साहित्यही सापडले आहे. घटनास्थळी एटीएस आणि पोलीस पोहचले असून त्यांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. शहरभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तपासकार्य सुरू झाले आहे.
=====================
१५ ऑगस्टपर्यंत दहा टक्के पाणीकपात
मुंबईकरांवर १५ ऑगस्टपर्यंत पाणीकपातीचे संकट कायम ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये आज जाहीर करण्यात आला.
गेली दोन महिने पाहिजे तसा पाऊस न पडल्याने पालिकेने कृत्रिम पावसाची तयारी सुरू केली होती. यासाठी इस्त्राईलच्या कंपनीशी चर्चा सुरू होती. तसेच पाणीकपातीमध्ये वाढ करण्याचा विचारही प्रशासकीय पातहीवर सुरू होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत तलाव क्षेत्रांत मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. त्यामुळे ४८ तासांमध्येच प्रमुख तलावांमध्ये एक लाख ४0 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे. संकटाच्या काळात वाढीव ४२ दिवसांचा हा साठा दिलासादायी असला तरी खबरदारी म्हणून आणखी पंधरा दिवस दहा टक्के पाणीकपात कायम राहणार आहे.
==========================
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मुंबई महानगर पालिकेमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी महापौर सुनील प्रभू , दिलीप पटेल, यशोधर फणसे
==============================
रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवला
रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरअसलेला वाघ्या कुत्र्याचा वादग्रस्त पुतळा संभाजीब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला आहे
वाघ्याच्या पुतळ्याचा इतिहासात कोठेही उल्लेख नाही, असे कारण पुढे करत संभाजी ब्रिगेडने गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा हटवण्याची मागणी केली होती .रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा मुद्दाम बसवण्यात आला आहे , असा आरोपही संभाजी ब्रिगेड करून करण्यात येत होता . महाराज्यांच्या इतिहासात कोठेही पुरावा नसापडणारा हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेड कडून सरकारला मुदत देण्यात आलीहोती , असेही सांगण्यात येते . परंतु सरकारने कोणतेहीपाऊल उचलले नाही . केवळ उत्सवाच्या दिवशी तिथे पोलीस कडक बंदोबस्त ठेवण्यात यायचा . अखेर कालरात्री काही कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा हा पुतळा हटवला .
=====================================
संजीव दयाळ नवे पोलिस महासंचालक
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजीव दयाळ यांची राज्याचे पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली.विद्यमान पोलिस महासंचालक के. सुब्रमण्यम मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी दयाळ यांची नियुक्ती झाली. दयाळ यांच्या नियुक्तीने रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदावर राज खिलनानी यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य राखीव पोलिस दलाच्या अप्पर महासंचालक श्रीदेवी गोयल यांना त्याच ठिकाणी महासंचालक या पदावर बढती देण्यात आली.पोलिस हाऊसिंग विभागाचे एम. डी. प्रवीण दीक्षित यांना त्याच ठिकाणी महासंचालक म्हणून बढतीवर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. दयाळ यांनी मुंबई पोलिस दलामध्ये सहआयुक्त या नात्याने काम केलेले आहे. पोलिस महासंचालकाच्या स्पर्धेत गेल्यावेळेस त्यांचे नाव होते. यावेळी चार ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नावातून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment