"अमर जवान' स्मारकाची मोडतोड करणाऱ्या दुसऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य तिघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2012

"अमर जवान' स्मारकाची मोडतोड करणाऱ्या दुसऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य तिघांना अटक

मुंबई- आझाद मैदान हिंसाचाराच्या वेळी "अमर जवान' स्मारकाची मोडतोड करणाऱ्या दुसऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या 58 वर गेली आहे. या तिघांना उद्या (ता. 31) सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

आझाद मैदान परिसरात 11 ऑगस्टला उसळलेल्या हिंसाचारात अमर जवान स्मारकाची मोडतोड झाली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी आज शाहबाज अब्दुल कादिर शेख (20) याला जेरबंद केले. जोगेश्‍वरी पूर्वेला राहणारा शाहबाज एका टूर कंपनीत चालक आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेतील कक्ष-10च्या पथकाने अब्दुल कादिर अन्सारी याला नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना बिहारमधून अटक केली होती. माहीम येथील रहेजा रुग्णालयासमोर शाहबाज शेख आज येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
दोन कोटी 12 लाखांचे नुकसान
आझाद मैदान हिंसाचारात झालेल्या नुकसानीचा पंचनामा गुन्हे शाखेने पूर्ण केला आहे. त्या वेळी 23 खासगी वाहने, 50 बेस्ट बसगाड्या, दोन ओबी व्हॅन आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांचे नुकसान झाले होते. नुकसानाची दोन कोटी 12 लाख रुपयांची रक्कम दंगलीला जबाबदार असलेल्यांकडून वसूल करण्यात येईल, अशी माहिती सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS