अल्पसंख्याक शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2012

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ

मुंबई- "प्री-मॅट्रिक' शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र सरकार देत असलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठीच्या ऑनलाईन अर्जाला दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी 10 सप्टेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज करता येईल. 

"प्री-मॅट्रिक' शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सहा लाख अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी या योजनेचा लाभ मिळाला. यंदा या शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील वर्षापर्यंत सहा लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन फेरनोंदणी करावयाची असून नवीन साधारण दीड लाख विद्यार्थी नव्याने अर्ज करतील; पण काही दिवसांपासून "इंटरनेटच्या सर्व्हर'मध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बरेच अल्पसंख्याक विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ केल्याचे अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS