‘फोटोग्राफिक सोसायटी’चे आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2012

‘फोटोग्राफिक सोसायटी’चे आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन


‘फोटोग्राफिक सोसायटी’चे आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन
मुंबई - ‘फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया’च्या वतीने उद्या १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता तेराव्या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे रिजिनल डायरेक्टर मंजिस्था मुखर्जी भट्ट यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
फोर्ट येथील डी. एन. रोडवरील साहेब बिल्डिंगमधील सोसायटीच्या कार्यालयात हे प्रदर्शन भरणार आहे. सोसायटीने नुकतीच डिजिटल छायाचित्रण स्पर्धा घेतली होती. ५० देशांतील ८१२ छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून बक्षीसपात्र ७५ छायाचित्रांची निवड करण्यात आली असून प्रदर्शनात हीच छायाचित्रे ठेवण्यात येणार आहेत. यातील विजेत्या छायाचित्रकारांना सुवर्णपदक बक्षीस म्हणून देण्यात आले असून उद्याच हा बक्षीस समारंभ होणार असल्याची माहिती सोसायटीचे श्याम मणचेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS