फाइव्ह गार्डन - तीन महिन्यांत दुरुस्ती
मुंबई - मुंबईचे वैभव असलेले फाइव्ह गार्डन लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. महापौर सुनील प्रभू यांनी आगामी तीन महिन्यांत फाइव्ह गार्डनची दुरुस्ती करण्याचे आदेशच प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे फाइव्ह गार्डनला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. पालिका सभागृहात उद्यानांचा प्रश्न नुकताच गाजला होता. त्याची महापौरांनी गंभीर दखल घेत फाइव्ह गार्डनची पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले. केवळ तीनच उद्यानांची डागडुजी करायची बाकी असून लवकरात लवकर निविदा काढून तीन महिन्यांत उद्यानाची दुरुस्ती होईल. उद्यानाच्या देखभालीचे तीन वर्षांचे कंत्राट देण्यात येणार असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment