| मुंबई : डॉ. सत्यपाल सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई पोलीस दलात आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे. प्रथम त्यांनी पोलीस आयुक्तांचे विशेष पोलीस पथक बरखास्त केले व समाजसेवा शाखा पुन्हा गुन्हे शाखेच्या अखत्यारित आणली. त्याचबरोबर पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी पायी गस्त घालणे, गणवेषात फिरणे त्याचबरोबर सामान्यांची गार्हाणी ऐकण्यासाठी पोलीस अधिकार्यांना सक्ती करण्यात आली असून पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह स्वत: लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या बदलाबरोबरच डॉ. सिंह यांनी मुंबई पोलीस दलात खांदेपालट केला आहे. मुंबई पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) रजनिश सेठ यांच्याकडे फोर्स वनची जबाबदारी देण्यात आली आहे, तर फोर्स वनचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते यांना सेठ यांच्या जागी आणले आहे. जावेद अहमद यांची कायदा व सुव्यवस्था अतिरिक्त महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी मुंबई पोलीस दलाची धुरा सांभाळताच आठवडाभरात अशा प्रकारे अनेक बदल करण्यास सुरुवात केली असून काही दिवसांत अनेक फेरफार होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. |
Post Top Ad
31 August 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment