मंत्रालयाला मिळणार नवा लूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2012

मंत्रालयाला मिळणार नवा लूक

मंत्रालयाला मिळणार नवा लूक 

मुंबई : महाराष्ट्राचा राज्यशकट हाकल्या जाणार्‍या मंत्रालयाच्या इमारतीला पुढील आठ महिन्यांत नवा 'लूक' मिळणार आहे. दोन महिन्यांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या या इमारतीचे संपूर्ण दुरुस्तीचे काम आणि नूतनीकरणाची योजना राज्य सरकारने विचारात घेतली आहे. मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, या पाश्र्वभूमीवर इमारतीत वातानुकूलित केंद्र बनवण्याचीही योजना असून प्रकल्पावर सुमारे 1.10 अब्जइतका खर्च अपेक्षित आहे. मंत्रालयाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे. 21 जून रोजी लागलेल्या आगीत मुख्य इमारतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्यात पाचजण ठार, तर कित्येक लोक जखमी झाले. त्या आगीपासून धडा घेत राज्य सरकारने मंत्रालयाच्या इमारतीत सुरक्षाविषयक विविध उपकरणे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाची इमारत वातानुकूलित बनवण्याबरोबरच अद्ययावत आगप्रतिबंधक प्रणाली बसवली जाणार आहे. प्रकल्पाचे कंत्राट निविदा प्रक्रियेत यशस्वी होणार्‍या 'पब्लिक लिमिटेड कंपनी'ला पुरवले जाणार आहे. पुढील चार महिन्यांत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्याचे नूतनीकरण, तर त्यापुढील चार महिन्यांत तळमजल्यासह पहिला, दुसरा आणि तिसर्‍या मजल्याचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS