मुक्त विद्यापीठाचा "बी.ए.रोड ट्रान्सपोर्टेशन"शिक्षणक्रम सुरु !
वाहन धारकांना व्यावसाय करीत असताना त्यांच्याच क्षेत्रातील डिप्लोमा अथवा डिग्री करता यावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या वर्षीपासून 'बी.ए.रोड ट्रान्सपोर्टेशन' हा शिक्षणक्रम विकसित केला आहे.
परवाना धारक वाहन चालक या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात. ज्या वाहन चालकांचे शिक्षण १२ वी इयत्तेपर्यंत पूर्ण झाले नाही अशा वाहन चालकांना प्रथम पूर्वतयारी शिक्षणक्रमास प्रवेश घ्यावा लागेल. मुंबईत शिवडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट, बांद्रा येथील युनायटेड मोटर ट्रेनिंग स्कूल, कांदिवली येथील सी.यु.शहा कॉलेज या अभ्यासकेंद्रांवर पूर्वतयारी आणि बी.ए.रोड ट्रान्सपोर्टेशनचे प्रवेश सुरु ३१ ऑगस्ट पर्यंत सुरु असून, पूर्वतयारी शिक्षणक्रमाचे वाहनचालकांसाठी असलेले सवलतीचे शुल्क रुपये ४००/- आकारले जाईल पुस्तकांसाठी जादा शुल्क देण्याची गरज नाही.
वाहन चालकांना केवळ पुस्तकांद्वारेच नाही तर वाहन चालविताना ऐकता येतील अशा सी.डी.आणि कम्युनिटी रेडिओ, ई-लर्निंग आणि डीव्हीडी मार्फत देण्यात येणार आहे. वाहन चालकांच्या जबाबदा-या, सुदृढ आरोग्य, अपघात,वाहतुकीचे तंत्रज्ञान, नियम इत्यादी विषयांचा समावेश या शिक्षणक्रमात केला असून विविध चित्रपटात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका उत्तम बजावलेले प्रसिद्ध सिने अभिनेते कादर खान यांनी स्वत: विविध वाहिन्यांवर या शिक्षणक्रमासाठी वाहन चालकांनी प्रवेश घ्यावा यासाठी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी २३८७४१८६/८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.


No comments:
Post a Comment