रेल्वे अपघातात सहा महिन्यांत १ हजार ६१८ जणांचा बळी
मुंबई - या वर्षीच्या जानेवारी ते जून या गेल्या सहा महिन्यांत रेल्वे अपघातात पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत व हार्बर लाइनच्या पनवेलपर्यंत १ हजार ६१८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
रेल्वे तसेच पोलिसांकडून होणार्या धोक्याच्या सूचनांना धाब्यावर बसवून प्रवासी जीवाशी खेळतात. यात ते स्वतःचा जीव गमावतात, पण कधी कधी आपल्याबरोबर दुसर्या प्रवाशाचादेखील जीव घेतात. गेल्या सहा महिन्यांत रूळ ओलांडताना, टपावरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरला चिकटल्यामुळे तसेच स्टंटबाजी करताना दीड हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. रेल्वे अपघातात बळी पडलेल्यांमध्ये १ हजार ४२५ पुरुष तर १९३ महिलांचा समावेश आहे. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक २१८ प्रवाशांचा बळी गेला असून त्यात १९२ पुरुषांचा समावेश आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाणे दुसर्या क्रमांकावर असून तेथे २१० तर बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७६ प्रवाशांचा नाहक जीव गेला आहे. अपघातात ठार झालेल्या १ हजार ६१८ जणांपैकी ५०३ जणांचा पत्ता लागलेला नाही, तर १ हजार ११५ मृतांची ओळख पटली आहे. या ५०० जणांमध्ये गर्दुल्ले, भिकार्यांचा अधिक समावेश असल्याचे पोलीस अधिकार्याने सांगितले.
रेल्वे रूळ ओलांडू नका, टपावरून प्रवास घातक आहे, स्टंटबाजी करू नका असे वारंवार प्रवाशांना सांगितले जाते पण काही अतिउत्साही प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात आणि अखेर जीवाला मुकतात. प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे अपेक्षित आहे. स्टंटबाजी करणार्यांना रोखणे गरजेचे आहे. कोणी या सूचनांचे पालन करीत नसल्यास सहप्रवाशांनी किमान त्या प्रवाशास रोखण्याचा प्रयत्न करावा किंवा पोलिसांकडे संपर्क साधावा.रेल्वे तसेच पोलिसांकडून होणार्या धोक्याच्या सूचनांना धाब्यावर बसवून प्रवासी जीवाशी खेळतात. यात ते स्वतःचा जीव गमावतात, पण कधी कधी आपल्याबरोबर दुसर्या प्रवाशाचादेखील जीव घेतात. गेल्या सहा महिन्यांत रूळ ओलांडताना, टपावरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरला चिकटल्यामुळे तसेच स्टंटबाजी करताना दीड हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. रेल्वे अपघातात बळी पडलेल्यांमध्ये १ हजार ४२५ पुरुष तर १९३ महिलांचा समावेश आहे. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक २१८ प्रवाशांचा बळी गेला असून त्यात १९२ पुरुषांचा समावेश आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाणे दुसर्या क्रमांकावर असून तेथे २१० तर बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७६ प्रवाशांचा नाहक जीव गेला आहे. अपघातात ठार झालेल्या १ हजार ६१८ जणांपैकी ५०३ जणांचा पत्ता लागलेला नाही, तर १ हजार ११५ मृतांची ओळख पटली आहे. या ५०० जणांमध्ये गर्दुल्ले, भिकार्यांचा अधिक समावेश असल्याचे पोलीस अधिकार्याने सांगितले.
- जी. एस. भंडारे, पोलीस उपायुक्त, लोहमार्ग
जानेवारी ते जूनपर्यंत पोलीस ठाणेअंतर्गत बळींची संख्या
छत्रपती शिवाजी टर्मिनस पुरुष महिला एकूणछत्रपती शिवाजी टर्मिनस ६७ ७ ७४
दादर ७९ ७ ८६
कुर्ला १९२ २६ २१८
कल्याण विभागठाणे १२० २९ १४९
डोंबिवली ६७ ६ ७३
कल्याण १७९ ३१ २१०
कर्जत २४ ६ ३०
हार्बर विभागवडाळा ८३ ९ ९२
वाशी ६६ ८ ७४
पनवेल २५ ३ २८
वांद्रे विभागचर्चगेट १२ ४ १६
मुंबई सेंट्रल ६४ ९ ७३
वांद्रे ५३ ३ ५६
अंधेरी ५७ ३ ६०
बोरिवली १६३ १३ १७६
वसई ११८ १८ १३६
पालघर ५६ ११ ६५
एकूण ४२५ १९३ १६१८
दादर ७९ ७ ८६
कुर्ला १९२ २६ २१८
कल्याण विभागठाणे १२० २९ १४९
डोंबिवली ६७ ६ ७३
कल्याण १७९ ३१ २१०
कर्जत २४ ६ ३०
हार्बर विभागवडाळा ८३ ९ ९२
वाशी ६६ ८ ७४
पनवेल २५ ३ २८
वांद्रे विभागचर्चगेट १२ ४ १६
मुंबई सेंट्रल ६४ ९ ७३
वांद्रे ५३ ३ ५६
अंधेरी ५७ ३ ६०
बोरिवली १६३ १३ १७६
वसई ११८ १८ १३६
पालघर ५६ ११ ६५
एकूण ४२५ १९३ १६१८
संपकरी पालिका कर्मचार्यांना व्याजासह बोनस
मुंबई - पालिकेच्या संपकरी कर्मचार्यांना बोनस देण्याच्या औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले. पालिका कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी केलेला संप हा बेकायदा होता असे म्हणता येणार नाही, असे मत न्यायमूर्ती अनुप मोहता यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.
महापालिकेने ६ आठवड्यांत प्रत्येकी ११ हजार रुपये याप्रमाणे बोनसची रक्कम १२ टक्के व्याजासह कामगारांना द्यावी, असा आदेश देऊन पालिकेची याचिका फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपकरी सुमारे ६० हजार कामगारांना बोनसचा लाभ मिळणार आहे. शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांना बोनस न देण्याचा निर्णय तत्कालीन पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी घेतला होता. त्या निर्णयाला आव्हान दिले असता औद्योगिक न्यायालयाने संपकरी कर्मचार्यांना बोनसची रक्कम साडेबारा टक्के व्याजासह द्यावी, असा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात महापालिका उच्च न्यायालयात गेली होती.
महापालिकेने ६ आठवड्यांत प्रत्येकी ११ हजार रुपये याप्रमाणे बोनसची रक्कम १२ टक्के व्याजासह कामगारांना द्यावी, असा आदेश देऊन पालिकेची याचिका फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपकरी सुमारे ६० हजार कामगारांना बोनसचा लाभ मिळणार आहे. शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांना बोनस न देण्याचा निर्णय तत्कालीन पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी घेतला होता. त्या निर्णयाला आव्हान दिले असता औद्योगिक न्यायालयाने संपकरी कर्मचार्यांना बोनसची रक्कम साडेबारा टक्के व्याजासह द्यावी, असा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात महापालिका उच्च न्यायालयात गेली होती.
दारिद्य्ररेषेखालील शहरी युवकांना मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षणमुंबई - सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत दारिद्य्ररेषेखालील मागासवर्गीय कुटुंबातील सदस्यांना रोजगार, स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. याच धर्तीवर दारिद्य्ररेषेवरील एपीएल कुटुंबातील युवकांनाही मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेला ‘यशवंतराव चव्हाण नागरी कौशल्य विकास योजना’ असे नाव देण्यात आले आहे. याचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, मागास आणि अल्पसंख्याक समाजातील युवकांना होईल.
महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना राबवली जाते. १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थींना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी प्रतिलाभार्थी दहा हजार रुपये खर्च केला जाईल. यातील सहा हजार रुपये प्रशिक्षण देणार्या संस्थेला प्रशिक्षणाच्या वेळी, लाभार्थीला रोजगार उपलब्ध झाल्यावर किंवा त्याने स्वयंरोजगार सुरू केल्यावर प्रशिक्षण संस्थेला तीन हजार रुपये दिले जातील. उर्वरित एक हजार रुपये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय या राज्यस्तरीय समन्वयक संस्थेला दिले जातील. लाभार्थ्यांचे प्रशिक्षण व परीक्षेचा खर्च उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत करण्यात येईल.
मॅकडोनाल्डच्या बर्गरमध्ये नख
मुंबई- उच्चतम प्रतीचे फास्ट फूड पुरविण्याचा टेंभा मिरवणार्या ‘मॅकडोनाल्ड’च्या फास्टफूडमध्ये एका अनिवासी हिंदुस्थानी महिलेला चक्क अर्धा इंचाचे नख सापडल्याने या महिलेने ‘मॅकडोनाल्ड’ला पोलीस ठाणे दाखवले आहे. दुबईस्थित ४१ वर्षीय रुचिका पांडे या महिलेला मालाड पश्चिम इथल्या ‘मॅकडोनाल्ड’मध्ये नुकताच हा किळसवाणा अनुभव आला. ही बाब तिने कर्मचार्यांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या कर्मचार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पांडे यांनी या प्रकरणाची सरळ पोलिसांत तक्रार केली.
नुकत्याच मुंबईत आलेल्या रुचिका पांडे या आपल्या दोघा मैत्रिणींसह रविवारी रात्री मालाड पश्चिम इथल्या ‘मॅकडोनाल्ड’मध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांनी तीन चिकन बर्गर मागवले. बर्गरचा स्वाद घेत असतानाच त्यांच्या बर्गरमध्ये चक्क अर्धा इंचाचे नख सापडले. हा किळसवाणा प्रकार घडल्याने पांडे आणि त्यांच्या मैत्रिणींचा हिरमोड झाला. त्यांनी लागलीच कर्मचार्यांचा बोलावून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. मात्र या कर्मचार्याने त्याकडे दुर्लक्ष करीत नख सापडलेले बर्गर कचरा पेटीत फेकून दिले. तसेच पांडे यांना दुसरे बर्गर आणून दिले.
विहांग ग्रुप ऑफ कंपनीज आणि संकल्प युवा प्रतिष्ठानच्या आमदार प्रताप सरनाईक यांनी दही हंडी उत्सवानिमित्त पत्रकार परिषद घेवून १० थराचे मानवी पिर्यामीड उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव विहांग व पूर्वेश उपस्थित होते.


No comments:
Post a Comment