धारावी प्रकल्प म्हाडाकडे देऊ नये
मुंबई : गेले अनेक वर्षे रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर 5 चा पुनर्विकास म्हाडाकडून करण्यात येणार असून धारावी प्रकल्पाचे काम म्हाडाकडे देऊ नये, अशी निवेदनवजा मागणी गुरुवारी धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्यांनी केली. धारावीकरांसोबतच्या चर्चेसाठी धारावी बचाव आंदोलन कार्यकत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी धारावी पुनविर्कास प्रकल्प मुख्याधिकार्यांची भेट घेऊन 400 चौ. फूट क्षेत्रफळाच्या घरांचीही मागणी केली.
धारावी विकास प्रकल्पातील झोपडीधारकांस 400 चौ. फुटांचे घर मिळावे या मागणीबरोबरच 1995 पूर्वीपासून गाळ्यावर वास्तव्य करून राहणार्या कु टुंबास प्रकल्पात समाविष्ट करावे, महानगरपालिकेच्या वसाहतीतील लोकांना किमान 1000 चौ. फुटांचे घर मिळावे, कुंभारवाडा आणि कोळीवाडा यांच्या उद्योगधंद्यांसहित त्यांच्या इच्छेनुसार विकास करावा, धारावीतील पापड व फरसाण व्यवसायाची योग्य सोय करावी, धारावी विकास प्रकल्पावर देखरेखीसाठी धारावी बचाव आंदोलनाची सेंट्रल कमिटी नियुक्त करावी, धारावी विकास प्रकल्पावर असलेले सल्लागार यांची हकालपट्टी करावी असेही निवेदनात सांगण्यात आले आहे. या शिष्टमंडळामध्ये धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने, मुत्तू तेवर, दिलीप कटके, प्रकाश आचरेकर, रामकृष्ण केणी, रमाकांत गुप्ता, राजू सूर्यवंशी, अनुषा कोडम याचा समावेश होता.

No comments:
Post a Comment