देशातील 90 टक्के वृद्ध आर्थिकदृष्टय़ा असुरक्षित! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2012

देशातील 90 टक्के वृद्ध आर्थिकदृष्टय़ा असुरक्षित!

देशातील 90 टक्के वृद्ध आर्थिकदृष्टय़ा असुरक्षित!
मुंबई : देशभरातील तब्बल 90 टक्के वृद्ध सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित नसून 35 टक्के वृद्धांचा घरात छळ होत असल्याची धक्कादायक माहिती ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. किंजवडेकर यांनी गुरुवारी दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी समितीच्या वतीने गुरुवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई व उपनगरातून शेकडो ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
   आजच्या घडीला ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या, लुटालूट आदी घटनाही घडू लागल्या आहेत. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. देशभरात दहा कोटी ज्येष्ठ नागरिक असून त्यापैकी तब्बल 66 टक्के लोकांच्या वाटय़ाला गरिबी आहे. 35 टक्के ज्येष्ठ नागरिकांचा घरातील माणसांकडूनच छळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर 17 टक्के ज्येष्ठ नागरिक एकटेपणाचे दु:ख सहन करत आहेत, तर आजारपणावरील उपचाराचा खर्च परवडत नाही म्हणूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे डॉ. किंजवडेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS