मुंबई पालिकेच्या संपकरी कर्मचाऱ्यांना बोनस
संपकरी मुंबई महापालिका कर्मचाऱयांना बोनस मिळणार आहे. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर २०११ मध्ये संप केला होता, या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. यासंदर्भात हायकोर्टानं मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या चाळीस हजार कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय तत्कालीन पालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी घेतला. त्याविरोधात कामगार नेते शरद राव यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि आज हायकोर्टानं कामगारांच्या बाजूनं निर्णय दिला. त्यामुळे संपावर गेलेल्या चाळीस हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांचे थकीत केलेलं बोनस व्याजासह मिळणार आहे. हायकोर्टाच्या या निर्णयावर कामगारांनी समाधान व्यक्त केलं आहे.


No comments:
Post a Comment