मुंबईमध्‍ये मनसे-रिपाइं कार्यकर्त्यांत धुमश्चक्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

मुंबईमध्‍ये मनसे-रिपाइं कार्यकर्त्यांत धुमश्चक्री


मुंबईमध्‍ये मनसे-रिपाइं कार्यकर्त्यांत धुमश्चक्री

राज यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रिपाइं व विद्यार्थी भारती संघटनांचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील घरी गेले. तेव्हा मनसेचे कार्यकर्ते तेथे पोलिस आयुक्तांच्या बदलीचा जल्लोष व्यक्त करत होते. 

दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यात विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली तर काही महिला कार्यकर्त्यांनाही दुखापत झाली मात्र  पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मंगळवारी आझाद मैदान येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी लखनऊमध्ये बुद्धाचा पुतळा तोडण्यात आला. तेव्हा रामदास आठवले, रा. सू. गवई, मायावती, प्रकाश आंबेडकर कुठे गेले असा प्रश्न करीत ते फक्त इंदू मिल इंदू मिल करीत बसतात. तेथे काय बंगला बांधायचा आहे का, असा प्रश्न केला होता. या वक्तव्यावर आठवले, आंबेडकरांनी जोरदार टीका केली.

राज यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रिपाईंचे काही कार्यकर्ते त्यांच्या घरी निघाले. मात्र मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळच त्यांना अडवले. प्रद्योत अडसुळ नावाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या झटापटीत पूनम गायकवाड, मेधा धुरी, स्मिता साळुंखे आणि विजेता बोणकर या महिला कार्यकर्त्यांनाही जखमा झाल्या. या महिला कार्यकर्त्यांना माहीम पोलीस स्टेशन येथे घेऊन जाण्यात आले. तेथे मनसे कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS