70 टक्के बेकायदेशीर होर्डिग्ज राजकीय पक्षांची - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

70 टक्के बेकायदेशीर होर्डिग्ज राजकीय पक्षांची


70 टक्के बेकायदेशीर होर्डिग्ज राजकीय पक्षांची
मुंबई : शहरातील एकूण बेकायदेशीर होर्डिग्जपैकी तब्बल 70 टक्के होर्डिग्ज विविध राजकीय पक्षांची असल्याची माहिती पालिकेतील परवाना विभागाच्या अहवालाद्वारे उघडकीस आली आहे. अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरात मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर होर्डिग्ज झळकले असून, पालिका प्रशासनाने त्याविरोधात 'बेकायदेशीर होर्डिग्ज हटाव' मोहीम हाती घेतली आहे.

पालिका प्रशासनाने दहीहंडी उत्सवानंतर मोठय़ा प्रमाणावर होर्डिग्ज हटवले. त्या मोहिमेदरम्यान एकूण 468 राजकीय होर्डिग्जपैकी सर्वाधिक 68 होर्डिग्ज शिवसेना पक्षाची होती. त्यापाठोपाठ काँग्रेस-66, मनसे-62 आणि भाजपा-59 या पक्षांचा क्रमांक लागला. बेकायदेशीर होर्डिग्जबाजीला जानेवारी महिन्यात ऊत आला होता. या एका महिन्यात तब्बल 8,656 होर्डिग्ज झळकले. फेब्रुवारी महिन्यात त्यात घट (684) जाणवली. कारण त्यावेळी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली होती. निवडणुकीनंतर बेकायदेशीर होर्डिग्जची संख्या पुन्हा 2,500 पर्यंत वाढली. आता सर्वानाच गणेशोत्सवाचे वेध लागल्याने राजकीय पक्षांनीही प्रसिद्धीसाठी ही नामी संधी असल्याचे ओळखून होर्डिग्जबाजीला सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात जवळपास 4 हजार बेकायदेशीर होर्डिग्जविरोधात कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. शहरातील 70 टक्के बेकायदेशीर होर्डिग्ज विविध राजकीय पक्षांकडून लावली गेल्याचे निदर्शनास आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील 8 महिन्यांत पालिकेने कारवाई केलेल्या एकूण 42,807 पैकी 29,554 बेकायदेशीर होर्डिग्ज विविध राजकीय पक्षांची होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS