सीएसटी येथे नवा सबवे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

सीएसटी येथे नवा सबवे


सीएसटी येथे नवा सबवे
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या (सीएसटी) पूर्वेकडील बाजूला नव्या सबवेचे बांधकाम करण्याची योजना रेल्वे आणि बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने आखली आहे. या परिसरात 'पीक अवर्स'मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्यामुळे प्रशासनाने नव्या सबवेची योजना विचारात घेतली आहे. सुमारे 100 कोटींहून अधिक रुपये खर्चून बांधल्या जाणार्‍या सबवेमुळे फोर्ट आणि चर्चगेटकडे जाणार्‍या प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार आहे. फोर्ट आणि चर्चगेट परिसरात विविध सरकारी तसेच खाजगी कार्यालये वसलेली आहेत. त्यामुळे 'पीक अवर्स'मध्ये सीएसटी स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होते. हे स्थानक जागतिक दर्जाचे बनवण्याची योजना कागदावरच रेंगाळली असताना मध्य रेल्वे प्रशासनाने नव्या सबवेच्या बांधकामाची योजना विचारात घेतली आहे. प्रस्तावित सबवेची जमिनीत 10 मीटर इतकी खोली राहणार असून प्रसिद्ध डी. एन. रोड (सुलभ शौचालयाच्या समोर) येथून या सबवेची सुरुवात होणार आहे. सीएसटी स्थानक परिसरात फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS