मनसेकडून महापौरांना खड्डय़ांच्या छायाचित्रांची भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

मनसेकडून महापौरांना खड्डय़ांच्या छायाचित्रांची भेट


मनसेकडून महापौरांना खड्डय़ांच्या छायाचित्रांची भेट
अजेयकुमार जाधव
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यावरील खड्डे अद्यापि बुजवण्यात आलेले नाहीत.या संदर्भात लक्ष वेधण्यासाठी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांचा 'छायाचित्र संग्रह' गुरुवारी महापौर सुनील प्रभू यांना भेट दिला.

मुंबई शहरासह उपनगरातील रस्त्यांवर  मोठय़ाप्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मुंबई महानगरपालिका फक्त 916 कि.मी.चे रस्ते सुधारणा करणे आणि खड्डे भरणे यावर 70 कोटी रुपये वर्षाला खर्च करते, असे असतानाही करदात्या मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असून रस्त्यांवर खड्डे की खड्डय़ातच रस्ते आहेत, हेच कळत नाही, असे दिलीप लांडे म्हणाले.
यावेळी मनसे रस्त्यावर उतरेल मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी सूचनावजा विनंती मनसे गटनेते दिलीप लांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. हे खड्डे दोन दिवसांत बुजवले गेले नाहीत तर मनसे आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून खड्डे बुजवणार्‍या ठेकेदारांना तसेच अधिकार्‍यांना 48 तासांत नव्हे तर आताच्या आता खड्डे बुजवा असे बजावून खड्डे बुजवून घेईल, असे सांगत कोणाला कधी खड्डय़ात घालायचे हे मनसे ठरवेल, अशा इशारा लांडे यांनी दिला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS