बेस्टच्या 80 हजार ग्राहकांना शून्य वीज बिल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 September 2012

बेस्टच्या 80 हजार ग्राहकांना शून्य वीज बिल

बेस्टच्या 80 हजार ग्राहकांना शून्य वीज बिल
मुंबई - बेस्टच्या आठ टक्के म्हणजे 80 हजार वीज ग्राहकांना शून्य वीज बिलाचा मनस्ताप होऊ लागल्याची बाब आज बेस्ट समितीच्या निदर्शनास आली. नादुरुस्त मीटरची समस्या किती गंभीर आहे हे सदस्यांनी आज प्रशासनापुढे मांडले. 

बेस्ट मुंबई शहरातील सुमारे 10 लाख ग्राहकांना वीज पुरवते. गेल्या वर्षभरात बेस्टने विजेचे मीटर बदलले; मात्र त्यानंतरही मीटरच्या तक्रारी कमी झाल्या नसून त्या वाढल्या आहेत. आता सुमारे 80 हजार ग्राहकांना शून्य रुपये बिल येत असल्याने त्यांचा मनस्ताप वाढला असल्याची बाब कॉंग्रेसचे रवी राजा यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली. सायन कोळीवाडा येथील ग्राहकाला पाच महिने शून्य बिल आल्यानंतर अचानक एका महिन्यात 85 हजार रुपये बिल आल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी चौकशीचा मुद्दा बैठकीत राखून ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS