आदिवासीचे घर पाडण्याच्या नोटिशीवरून / पालिका सहायक आयुक्तांवर अवमान नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 September 2012

आदिवासीचे घर पाडण्याच्या नोटिशीवरून / पालिका सहायक आयुक्तांवर अवमान नोटीस

आदिवासीचे घर पाडण्याच्या नोटिशीवरून 
पालिका सहायक आयुक्तांवर अवमान नोटीस
मुंबई - उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना मालाडच्या आदिवासी रहिवाशाचे घर पाडण्याची नोटीस देणारे पालिकेचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यावर उच्च न्यायालयाने अवमानासंदर्भात म्हणणे मांडण्याची नोटीस दिली. 

लहू रामचंद्र पिलेना यांनी संजीव सावंत व समीर सूर्यवंशी यांच्यामार्फत सादर केलेल्या याचिकेवर न्या. शरद बोबडे व न्या. राजेश केतकर यांनी नुकताच वरील आदेश दिला. अर्जदाराचे घर तोडण्यासाठी पालिकेने याआधीही नोटीस दिली होती, त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित होती. इतकेच नव्हे, तर त्या घरासंदर्भात पालिकेने "जैसे थे' स्थिती ठेवावी, असा आदेशही खंडपीठाने पूर्वीच दिला होता; तरीही सहायक आयुक्तांनी वरील आदेश दिल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS