असीम त्रिवेदीने मोहंमद पैगंबरांचेही व्यंग्यचित्र काढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2012

असीम त्रिवेदीने मोहंमद पैगंबरांचेही व्यंग्यचित्र काढले




असीम त्रिवेदीने मोहंमद पैगंबरांचेही व्यंग्यचित्र काढले
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करीत जामीन घेण्यास नकार देणारा व्यंग्यचित्रकार असीम त्रिवेदी याने डॅनिश चित्रकाराने मोहंमद पैगबरांच्या काढलेल्या व्यंग्यचित्राबाबत प्रतिक्रिया विचारता मौन धारण केले. तसेच त्याने स्वत:ही पैगंबरांचे व्यंग्यचित्र काढले असल्याचे मान्य केले. गृह विभागाने ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून या वक्तव्यावरून वाद होऊ नये म्हणून अफवांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

संसद व राजमुद्रेचा अवमान करणारी व्यंगचित्रे काढल्याबद्दल असीम त्रिवेदी याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. बुधवारी तुरुंगातून बाहेर पडल्या नंतर असीमने प्रेस क्लब मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. ‘डॅनिश कलाकाराने मोहम्मद पैगंबरांचे व्यंग्यचित्र काढले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. त्या कलाकाराला तू सर्मथन देशील का?’ या प्रश्नावर असीम म्हणाला की, मी ते पाहिलेले नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ‘तू स्वत:ही मोहम्मद पैगंबराचे व्यंग्यचित्र काढले आहेस’, असे पत्रकारांनी विचारताच असीम त्रिवेदी म्हणाला की, मी कोणाचाही अनादर करण्यासाठी ते चित्र काढले नाही. सेंसॉर बाबतचा एक मुद्दा होता. त्या मुद्दय़ाला अनुसरून मी ते चित्र काढले होते, असे त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, त्रिवेदी यानेही पैगबरांचे व्यंगचित्र काढल्याचे स्वीकार करताच मुंबईभर एसएमएस फिरू लागले. गृहविभागाने लगेचच याची दखल घेत 11 ऑगस्ट प्रमाणे पुन्हा काही होऊ नये म्हणून अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS