महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने नियम करावेत
मुंबई - रात्री-अपरात्री टॅक्सीने एकट्या जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने नियम केले पाहिजेत, असे उच्च न्यायालयानेच आज बोलून दाखवले. पुण्यातील विप्रो कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची बलात्कार करून हत्या करणाऱ्या दोघा जणांनी फाशीच्या शिक्षेविरुद्ध केलेल्या अपीलाच्या सुनावणीदरम्यान न्या. विद्यासागर कानडे आणि प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने हे मतप्रदर्शन केले.
रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे, पण एकटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनेही पावले उचलली पाहिजेत, असे खंडपीठाने सांगितले. महिला कर्मचाऱ्यांखेरीज रात्री एकट्या प्रवास करणाऱ्या अन्य महिलांचे काय? अनेक महिला विमानतळापासून घरापर्यंत एकट्याच टॅक्सीने जातात; त्यांच्या सुरक्षेसंदर्भात काही नियम आहेत का? आदी प्रश्न न्यायालयाने विचारले. कंपनीतील शेवटच्या दिवशीच पुण्यातील संबंधित महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या झाली होती. तिचा कामावरील शेवटचा दिवस असल्याची माहिती त्या वाहनचालकाला होती का आदी बाबींची पोलिसांनी चौकशी करायला हवी, असेही खंडपीठाने सांगितले. |
Post Top Ad
11 September 2012
Home
Unlabelled
महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने नियम करावेत
महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने नियम करावेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment