| भाडे संकलकाचा साडेसात लाखांचा अपहार पालिका न्यायालयात जाणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभागातील भाडे संकलकाने 7 लाख 49हजार 841 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने भाडे संकलक सुभाष सोनार यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या मंजुरीकरिता येत्या शुक्रवारी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. एम-पूर्व वॉर्डमधील झोपडपट्टी सुधारणा खात्यातील भाडे संकलक सुभाष सोनार यांनी पदावर कार्यरत असताना 1 ऑगस्ट 2006 ते 13 नोव्हेंबर 2006 या कालावधीत महापालिका भरपाई शुल्काच्या वसुलीची जादा पावती पुस्तके स्वत:च्या नावे घेतली. त्यानंतर सोनार यांनी 13 जुलै 2007 पर्यंत ते कार्यालयात जमा न करता त्यातील पावत्यान्वये वसूल केलेल्या एकूण भरपाई शुल्काचा अपहार केला आहे. सोनार यांचा हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांना 7 एपिल्र 2011पासून बडतर्फ करण्यात आले होते. सुभाष सोनार यांना पालिकेकडून 2 लाख 38 हजार एवढी भविष्य निर्वाह निधीची देय रक्कम आहे, मात्र या रकमेवर टाच आणता येत नसल्याने त्यांनी अपहार केलेल्या रकमेची वसुली करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पालिका अधिनियम कलम 517 एच अन्वये न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. |
Post Top Ad
11 September 2012
Home
Unlabelled
भाडे संकलकाचा साडेसात लाखांचा अपहार / पालिका न्यायालयात जाणार
भाडे संकलकाचा साडेसात लाखांचा अपहार / पालिका न्यायालयात जाणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment