खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2012

खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स


खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स
दहिसर, बोरिवली येथील विविध कारणांमुळे रुंदीकरण रखडलेल्या रस्त्यांची महापौर सुनील प्रभू यांनी सोमवारी पाहणी केली. दहिसर जोड मार्गावरील टेकडी आणि झोपडपट्टीलगतच्या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करून परिसर अतिक्रमणमुक्त करावा. यासोबत बोरिवली येथील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेतून जाणार्‍या एस. व्ही. मार्गाच्या रुंदीकरणासाठी संबंधित आस्थापनास टीडीआर द्यावा, अशी सूचना या वेळी महापौरांनी केली. प्रादेशिक परिवहन विभागाची इमारत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणावर होणार्‍या गैरसोयीकडे महापौरांनी या वेळी लक्ष घातले. संबंधित अधिकार्‍यांना प्रादेशिक परिवहन विभागाची तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना या वेळी महापौरांनी केली. दहिसर स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे कायमस्वरूपी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यासाठी 60 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या वेळी आ. विनोद घोसाळकर यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS