पिसे प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2012

पिसे प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित


पिसे प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पिसे पांजरापोळ प्रकल्पासाठी 1980च्या सुमारास येथील गावकर्‍यांची जमीन ताब्यात घेतली होती. मात्र 33 वर्षानंतरही या प्रकल्पग्रस्तांतील 60-70 प्रकल्पग्रस्त अजूनही पालिकेच्या नोकरीपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह स्थायी समितीतील सदस्यांसाठी बुधवारी पिसे-पांजरापोळ, मोडकसागर व तानसा तलावांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. पिसे-पांजरापोळ येथील प्रकल्पाला संबंधितांनी भेट दिली असता पिसे गावातील रमेश पाटील या प्रकल्पग्रस्ताने महापौरांसमोर येत आपले गार्‍हाणे मांडले. पालिकेने 1980 च्या दरम्यान पिसे-पांजरापोळ प्रकल्पासाठी येथील गावकर्‍यांची जमीन घेतली. आतापर्यंत यातील 60 ते 70 प्रकल्पग्रस्तांना पालिकेकडून नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले; परंतु शिक्षणाच्या अटीमुळे अद्यापि 60-70 प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित असल्याचे सांगत पाटील याने पालिकेने ही शिक्षणाची अट शिथील करावी, अशी विनंती महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली. या वेळी महापौरांनी पाटील यांना पालिका मुख्यालयातील आपल्या कार्यालयात यासंदर्भात निवेदन घेऊन येण्यास सांगितले. यानंतर आपण स्वत: पालिका अधिकार्‍यांबरोबर संयुक्त सभा आयोजित करून येथील राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ, असे आश्वासन दिले. दरम्यान या तलाव पाहणी दौर्‍यात पालिका इतिहासात प्रथमच सर्वाधिक स्थायी समिती सदस्यांनी उपस्थिती लावली होती. महापौर सुनील प्रभू, उपमहापौर मोहन मिठबावकर, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृह नेते यशोधर फणसे, मनसे गटनेते दिलीप लांडे, भाजपा गटनेते दिलीप पटेल, राष्ट्रवादी गटनेते धनंजय पिसाळ, विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम, शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोळ, सपाचे गटनेते रईस शेख यांच्यासह डॉ. शुभा राऊळ. डॉ. अनुराधा पेडणेकर, तृष्णा विश्वासराव, मनोज कोटक, शीतल म्हात्रे, असिफ झकेरिया आदी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS