अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2012

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई


अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
मुंबई : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिका प्रशासनाने राबवलेल्या मोहिमेत शहर आणि उपनगरातील एकूण 60 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 3 लाख 64 हजार 820 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या निर्देशानुसार आणि महापालिका उपायुक्त ए. एल. वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपअनुज्ञापन अधीक्षक भगवान साठे यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही सत्रांत कारवाई केली. शहरातील जी/उत्तर विभाग परिसर, बोरिवली रेल्वे स्थानक, एस. व्ही. मार्ग, एल. टी. मार्ग, जयहिंद वसाहत, चंदावरकर गल्ली, महात्मा गांधी मार्ग, कांदिवली (पूर्व) आकुर्ली मार्ग, अशोक नगर तसेच पूर्व उपनगरातील मदर डेरी मार्ग, सीएसटी मार्ग, तुंगा व्हिलेज, चांदिवली, साकी विहार मार्ग या ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, एकूण 60 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 3 लाख 64 हजार 820 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS