पाणीकपात रद्द करा - मनसे
मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या सर्वच तलावांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यामुळे मुंबईमधील 10 टक्के पाणी कपात रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते दिलीप लांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. जून-जुलै महिन्यांत पावसाच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलशयांमधील पाणी कमी होत असल्यामुळे पालिका प्रशासनाने 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता; सद्यस्थितीत पडत असलेला पाऊस आणि जलाशयांतून तुडुंब भरून वाहून जाणारे पाणी या गोष्टी लक्षात घेऊन मुंबईकरांवर लादलेली 10 टक्के पाणी कपात ताबडतोब रद्द करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी दिलीप लांडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
Post Top Ad
13 September 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment