आझाद मैदान हिंसाचार / वक्‍त्यांच्या परदेशवाऱ्यांची चौकशी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

आझाद मैदान हिंसाचार / वक्‍त्यांच्या परदेशवाऱ्यांची चौकशी होणार

आझाद मैदान हिंसाचार
वक्‍त्यांच्या परदेशवाऱ्यांची चौकशी होणार
मुंबई- आझाद मैदान येथे रझा अकादमीने आयोजित केलेल्या निदर्शनांच्या वेळी उसळलेल्या हिंसाचाराचा तपास करण्यासाठी तेव्हा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या 17 वक्‍त्यांच्या परदेशवाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तसा तपशील या 17 जणांकडून मागविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

आसाम आणि म्यानमार येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ रझा अकादमी आणि मदिनातुल फाऊंडेशन यांनी 11 ऑगस्टला आझाद मैदान येथे निदर्शने आयोजित केली होती. त्या वेळी उसळलेल्या हिंसाचारात दंगलखोरांनी पोलिस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण केली, त्यांच्या वाहनांची जाळपोळ केली, महिला पोलिसांचा विनयभंग केला. त्या वेळी आझाद मैदानातील व्यासपीठावर 17 वक्ते उपस्थित होते. त्यापैकी काही जणांची भाषणे प्रक्षोभक असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 


व्यासपीठावरून झालेल्या भाषणांमुळे दंगलखोरांना चिथावणी मिळाली का, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या 17 वक्‍त्यांना परदेशातून अशी निदर्शने आणि सभेच्या आयोजनाबाबत सूचना मिळाल्या होत्या का, हे गुन्हे शाखा तपासत आहे. त्यामुळे संबंधित वक्‍त्यांच्या परदेश प्रवासाची माहिती पोलिसांनी मागविली आहे. परदेशात असताना त्यांनी कोणाची भेट घेतली, याचा तपशील त्यांच्याकडून घेतला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS