काँग्रेस खासदार नविन जिंदालांचा पत्रकारांना 'दे धक्का' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2012

काँग्रेस खासदार नविन जिंदालांचा पत्रकारांना 'दे धक्का'




काँग्रेस खासदार नविन जिंदालांचा पत्रकारांना 'दे धक्का'


नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्यात फायदा झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार नविन जिंदाल यांचे आज संतुलन ढळले. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने जिंदाल यांना प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर देण्याऐवजी त्याच्याशी हुज्जत  घातली. तसेच कॅमेरामॅनला धक्का देऊन दूर लोटले.

जिंदाल यांची कंपनी जिंदाल पॉवर एंड स्टील हिच्यावर पॉवर प्लॉंटला स्वस्त कोळसा पदरात पाडून महाग दरात वीज विकल्याचा आरोप आहे. "झी बिझनेस' च्या प्रतिनिधीने या आरोपाबाबत जिंदाल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते पत्रकारावर भडकले. प्रथम ते म्हणाले, मी कार्यक्रमाला जात आहे. त्यानंतर तुम्ही कुठून आला आहात. त्यावर पत्रकाराने झी न्यूझकडून आल्याने सांगताच जिंदाल त्याच्यावर उसळले व झी न्यूझ बकवास बातम्या दाखवत आहे असे म्हणत पत्रकाराशी हुज्जत घातली. ही दृश्य टिपत असलेल्या कॅमेरामॅनला जिंदाल यांनी ढकलून दिले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS