स्रर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी बनले हमाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

स्रर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी बनले हमाल

स्रर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी बनले हमालमुंबई - शाळांचा विकास साधणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेणे, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी असलेले सर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी महापालिका शाळांमध्ये सध्या हमालाचे काम करीत आहेत. शाळा सुधार प्रकल्पातर्ंगत शाळांना मिळणारे शैक्षणिक साहित्य ने-आण करण्याची जबाबदारी या कर्मचार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. पालिकेच्या बजेटमध्ये या प्रकल्पासाठी ४८ कोटींची तरतूद असूनही हमालीसाठी कंत्राटी कामगार न नेमता सर्वशिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांना गोवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. 


मराठी माध्यमाच्या ८४ व उर्दू माध्यमाच्या ६४ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली असून पंचतारांकित हॉटेल्समध्ये पालिकेच्या शिक्षकांना या प्रकल्पाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. प्रकल्पातील कामांसाठी वेगळा निधी मंजूर असूनही सर्व शिक्षा अभियानातील कामासाठी मंजूर केलेला निधी या उपक्रमासाठी वापरण्यात आल्याने शाळासुधार प्रकल्पाचा निधी कुठे गेला, असा प्रश्‍न शिक्षण क्रांती दलाने उपस्थित केला आहे.


सर्व शिक्षा अभियानातील एकही पैसा शाळा सुधार प्रकल्पासाठी वापरला नाही. साहित्याच्या ने-आण करण्याचा व प्लॅस्टिक पिशव्यांचा खर्च सर्व शिक्षा अभियानातून करू शकतो. मात्र शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या निधीचाच वापर केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS