दत्तक वस्ती योजनेऐवजी नवीन योजनेला विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2012

दत्तक वस्ती योजनेऐवजी नवीन योजनेला विरोध

दत्तक वस्ती योजनेऐवजी नवीन योजनेला विरोध 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेली 'दत्तक वस्ती योजना' गुंडाळण्याचा डाव आखण्यात आला आहे. या योजनेच्या जागी 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना' आणण्याचा खटाटोप राजकीय दबावापोटी सुरू करण्यात आला आहे; पण या योजनेला आमचा कायमस्वरूपी विरोध राहील, असा पावित्रा संस्थाचालकांनी घेतला आहे. 

2001 साली मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी 'दत्तक वस्ती योजना' सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून अंदाजे 9 हजार 200 स्वंयसेवक स्वत:चे पोट भरत आहेत. या योजनेत सुमारे 80 टक्क्यांहून अधिक संस्था मराठी आणि मागासवर्गीयांच्या आहेत. या योजनेसाठी महापालिकेने अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तरतूद केली आहे; पण, या योजनेच्या जागी महापालिकेने 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना' आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे दत्तक वस्ती योजनेत काम करणार्‍या हजारो गोरगरीबांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या योजनेत आम्ही 10 वर्षापासून काम करत आहोत; पण या योजनेच्या जागी 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना' आणत असल्यामुळे गोरगरीबांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दत्तक वस्ती योजनेत उणिवा असल्यास आम्हाला दाखवून द्या, आम्ही सुधारणा करू, अशी भूमिका प्रबुद्ध मित्र मंडळाचे संस्थाचालक लहू कांबळे यांनी मांडली. नवीन योजनेत आम्हाला सामावून घेतील याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे या योजनेला आमचा कायमस्वरूपी विरोध राहील, असेही त्यांनी सांगितले.
     

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS