पाणी चोरीप्रकरणी जल अभियंत्यांचे आदेश धाब्यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2012

पाणी चोरीप्रकरणी जल अभियंत्यांचे आदेश धाब्यावर

पाणी चोरीप्रकरणी जल अभियंत्यांचे आदेश धाब्यावर
मुंबई : पाणीगळती व शिफ्टिंगच्या नावावर अनधिकृतपणे जलजोडण्या देऊन पालिकेचे नुकसान करणार्‍यांवर कारवाई करावी, असे आदेश मुंबईचे जल अभियंत्यांनी दिले आहेत. मात्र वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न पालिकेचे अधिकारी करत आहेत. या प्रकरणी त्वरित कार्यवाही न झाल्यास पालिकेसमोर 'पाणी बचाव' आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाने दिला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिकेने मुंबईकरांवर पाणीकपात लादली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेतील काही कनिष्ठ, दुय्यम अभियंते व मिस्त्री हे कामगारांना हाताशी धरून अनधिकृतपणे जलजोडण्या करत आहेत. महानगरपालिकेच्या 'एम' पश्चिम विभागात पाणीगळती व शिफ्टिंगच्या नावावर मोठय़ा प्रमाणात असले प्रकार घडत असल्याची बाब पीआरपीचे चेंबूर तालुका उपाध्यक्ष भास्कर गायकवाड यांनी पुराव्यानिशी पालिका आयुक्त व मुख्य जलअभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली होती. 

'एम' पश्चिम विभागात झालेल्या अनधिकृत जल जोडण्यांप्रकरणी या विभागातील संबंधितांविरुद्ध कार्यवाही करावी, असे आदेश जलअभियंता र. ग. बांबळे यांनी पूर्व उपनगरचे उप जलअभियंता आप्पासाहेब शिंदे यांना दिले आहेत, मात्र वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप पीआरपीने केला आहे. अधिकृत जलजोडणीधारकांवर पाणीकपात लादून अनधिकृत जलजोडणीधारकांवर 'अर्थकृपा' करणार्‍यांविरोधात कारवाई न झाल्यास पालिकेसमोर 'भ्रष्टाचार हटाव पाणी बचाव' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीआरपीने दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS