महापालिकेच्या शाळेतील 11 विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाची बाधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2012

महापालिकेच्या शाळेतील 11 विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाची बाधा

मुंबई- सुगंधी दूध वितरणाच्या दुसऱ्याच दिवशी मालवणीतील महापालिकेच्या उर्दू शाळेतील 11 विद्यार्थांना दूध बाधल्याची घटना आज घडली. या विद्यार्थ्यांना तत्काळ बोरिवलीतील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर इतर महापालिकेच्या शाळांमधील दुधाचे वितरण तत्काळ थांबविण्यात आले आहे. 

सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे शाळेतील विद्यार्थ्यांना सुंगधी दूध बाधल्यानंतर विद्यार्थ्यांना दुधाचे वितरण थांबविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारपासून (ता. 10) पालिका शाळांमध्ये पुन्हा सुगंधी दूध देण्यास सुरुवात करण्यात आली; मात्र दुसऱ्याच दिवशी मालवणी गेट क्रमांक 1 येथील एम.एच.बी. उर्दू शाळा क्रमांक 3 मधील 8 ते 11 वयोगटातील 11 विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दूध प्यायल्यानंतर पोटात मळमळणे आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना लगेचच भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या घटनेनंतर या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले. 

बाधा झालेले विद्यार्थी 
शिप्पा हसन (8.6), अमाईन शेख (8), आसिफ सल्लाउद्दीन (8), मुस्कान जमीर (13), गुलनाज बानो (11), सलमान बलाल (13), नदीम शेख (12), शादाब शेख (12), मुंबसरा बद्रुदीन (11), आफरीस शेख (10), आसिफ शेख (10). 

सुगंधी दूध वितरणाचे कंत्राट महानंद डेअरीला मिळाले आहे. प्रत्यक्षात ते हरियानाच्या गोपाळजी डेअरीचे आहे. सुरुवातीला याच डेअरीतून सुगंधी दुधाचा पुरवठा होत होता. तेव्हा राज्याबाहेरील डेअरीतून होणाऱ्या पुरवठ्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS