| अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या वाढणार नवी दिल्ली : अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या वर्षाला सहापर्यंत मर्यादित करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जनमानसात सरकारविरोधात निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी सरकार हा निर्णय बदलण्याच्या उद्देशाने फेरविचार करत आहे. सरकारच्या विचारांचे निर्णयात रूपांतर झाल्यास येत्या दसरा-दिवाळी सणाला अनुदानित सिलिंडरची संख्या वर्षाला 12 करण्याची घोषणा सरकार करू शकते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी कॅबिनेट बैठकीनंतर फेरविचार करण्याला हिरवा कंदील दिला आहे. या फेरविचार करण्याची जबाबदारी पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांच्यावर सोपवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. |
Post Top Ad
13 October 2012
Home
Unlabelled
दिवाळीत 12 सिलिंडर्सचा धमाका
दिवाळीत 12 सिलिंडर्सचा धमाका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment