मंत्रालय उडविण्याची धमकी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2012

मंत्रालय उडविण्याची धमकी

मुंबई : महाराष्ट्राचा राज्यशकट हाकणार्‍या मंत्रालयाच्या इमारतीसह मुंबई आणि नागपूर येथील महत्त्वाची सरकारी आस्थापने बॉम्बने उडवून देण्याच्या पत्राने सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला चार वर्षे पूर्ण होत असतानाच, अज्ञात इसमाने पत्राद्वारे दिलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी 'हाय अँलर्ट' जारी करून शहरातील सरकारी आस्थापनांच्या आवारातील सुरक्षेत मोठय़ा प्रमाणावर वाढ केली आहे.

विशिष्ट वेळेत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारे निनावी पत्र गुरुवारी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हाती पडले. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम असल्याने प्रशासनाने त्या पत्राची गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या मुंबईतील मंत्रालय, विधान भवन, आमदार निवास, मनोरा हॉस्टेल आणि उपराजधानी नागपूर येथील विधान भवन बॉम्बने उडवून देण्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे. मंत्रालयातील अधिकार्‍यांनी या पत्राची मुंबई पोलिसांना कल्पना दिली आहे. संभाव्य दहशतवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी दक्षिण मुंबईत 'हाय अँलर्ट' जारी केला असून सरकारी आस्थापनांच्या आवारात सुरक्षेत वाढ केली आहे. दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांची तपासणी केली जात आहे. पत्रात उल्लेखलेली वेळ उलटून गेल्याने ते पत्र अफवा असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. तथापि, संबंधित पत्र दुर्लक्ष करण्याजोगे नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS