संकल्प प्रतिष्ठानतर्फे 'आपला दांडिया 2012'चे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2012

संकल्प प्रतिष्ठानतर्फे 'आपला दांडिया 2012'चे आयोजन

ठाणे : ठाण्यातील रघुनाथ नगरातील संकल्प प्रतिष्ठानतर्फे 'आपला दांडिया 2012'चे आयोजन केले आहे. संकल्प प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवात दरवर्षी नवनव्या संकल्पनांचा अविष्कार ठाणेकरांना नेहमीच आकर्षण ठरत आहे. यंदाही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने 16 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत आपला दांडिया 2012 चे आयोजन केले आहे. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच हिंदी व मराठी सिनेतारकांबरोबरच गायकांची मोठय़ा प्रमाणात मांदियाळी येथे येणार्‍या भाविकांना पाहायला मिळेल, असे संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

यावर्षी पुरातन नवदुर्गा मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे. हा देखावा कौस्तुभ क्रिएशनने साकारला आहे. विद्युत रोषणाईच्या झगमगाटात अत्याधुनिक साऊंड सिस्टिमच्या तालावर प्रख्यात गायक-गायिकांच्या आवाजात दांडिया रसिकांचा आनंद द्विगणित करतील. 9 दिवस विविध कार्यक्रमांतर्गत दररोज पारंपरिक वेषभूषेतील विविध दांडिया स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी सांगितले. या उत्सवामध्ये ठाणेकर नागरिकांसाठी विशेषत: लहान मुलांकरिता आनंदमेळाअंतर्गत विविध करमणुकीची व खेळाची साधने तसेच स्टॉल रहेजा रोड तरण तलाव लगतच्या मैदानात करण्यात येणार असून या आपला दांडिया 2012 यात सर्वानी सहभागी व्हावे असे नागरिकांना संकल्प प्रतिष्ठानतर्फे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीची धूम, देवीचे दर्शन, सोशल नेटवर्किग साईटवर पहावयास मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS