माजी सैनिक संघटनेची 20 ऑक्टोबरला सभा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2012

माजी सैनिक संघटनेची 20 ऑक्टोबरला सभा

मुंबई : माजी सैनिक संघटनेने शासनाकडे केलेल्या पल्रंबित मागण्यांचा विचार व्हावा यासाठी 20 ऑक्टोबरला मुंबई कार्यालयात एका जाहीर सभेचे आयोजन केले असून या सभेसाठी राज्यातील संघटनेच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष एस. के. शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार संघ येथे केले. मेडिक्लेम, घरांचा प्रश्न, वेतन आयोगात पेन्शनच्या वाढीची सुधारणा, दिवंगत सैनिकांच्या विधवांच्या पल्रंबित मागण्या आदी मागण्यांचा या सभेत विचारविनिमय होणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ज्या सैनिकांनी जीवावर उदार होऊन देशासाठी प्राण अर्पण केले किंवा आज जे वृद्धावस्थेत आहेत त्यांच्या कल्याणासाठी व कुटुंबासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS