ठाणे पालिकेचा ३० वा वर्धापन दिन समारोह संपन्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ठाणे पालिकेचा ३० वा वर्धापन दिन समारोह संपन्न

Share This

ठाणे / विठ्ठल कांबळे ( 9619076443 )
             ठाणे महानगर पालिकेचा ३० वा वर्धापण दिन १ ऑक्टो २०१२ रोजी गडकरी रंगायतन येथे मोठ्या जल्लोषात  साजरा करण्यात आला. यावेळी विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला शिवेसेना ठाणे जिलासंपर्कप्रमुख एकनाथ शिंदे, महापौर हरीशंद्र पाटील,उपमहापौर मिलिंद पाटणकर,सभाग्रह नेते नरेश म्हस्के,विरोधी पक्षनेते हनमंत जगदाळे,कॉंग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक ,शिवसेना गटनेते संतोष वदवले,नगरसेवक विक्रांत चव्हाण,सुहास देसाई आणि गिरीश राजे आदी मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी  ठाणे शहरातील पायाभूत सुविधा इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्ती असल्याचे सांगून शहराच्या विकासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे महापौर हरीशंद्र पाटील यांनी सांगितले. ठाणे पालिकेच्या ३० व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. ठाणे शहर आंतराष्ट्रीय दर्जाचे बनावे यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम केल्यास भविष्यात निशितच सर्वांगी सुंदर बनेल असा विश्वास त्यांनी मान्यवरांसमोर व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages